१) सुस्पष्ट ध्येय आणि उद्दिष्ट नसणे –
उद्योजक म्हणून सर्वात मोठी घोडचूक जर काही असेल तर सुनिश्चित ध्येय नसणे. रिसर्च असा सांगते की अनेक उद्योजक परिणामांचा विचार न करता उद्योगात उतरतात.
उद्योगाचा आराखडा मांडण्या साठी पुढील काही महत्वाच्या बाबींचा समावेश करणे गरजेच आहे.
o अल्पावधी आणि दीर्घावधी ध्येय
o तुमचं उत्पाद किंवा सेवा
o ग्राहक वर्ग
o उत्पाद ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीची सूची
o कामगारांच्या जबाबदाऱ्यांचा गोषवारा Summary.

२) आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष –
मराठीत म्हण आहे ” सगळ्या गोष्टींच ढोंग करता येत पण पैशाच ढोंग करता येत नाही ” उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळ उपलब्धता करण्यात जर अपयश आलं तर एक गोष्ट नक्की की तुमचा उद्योग टेक ऑफ करणारच नाही. तुमच्या उद्योगाच्या भरभरासाठी भांडवल उभे करणे तितकेच महत्वाचे आहे जितके जगण्या साठी oxygen.
उद्योग सुरु करण्या आधीच आर्थिक पाठबळ कुठून मिळेल याची तरतूद करणे गरजेचे आहे. तुमच्या स्वतःकडे जर भांडवल नसेल तर financial पार्टनर शोधा. मित्रपरिवाराकडून मदत होते का ते पहा , पण भांडवलाच्या अभावात उद्योग सुरु करू नका.

३) सुपरमॅन असल्यासारखे वागणे –
हे खरं आहे की बहुतेक नवोदित उद्योजक सर्व कामं स्वतःच कुणाची मदत न घेता करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही उद्योगासाठी घातक ठरू शकते. एक sustainable उद्योग उभा करणे हे खूप मोठ्ठे आव्हान आहे आणि हे एका माणसाचे काम नाही हे लक्षातअसु द्या. त्यामुळे सर्वकाही स्वतः करण्याचे टाळा आणि तज्ञांची मदत घ्या.

४) अति लोभ –
उद्योग सुरु करण्यामागे खूप पैसे कमावून श्रीमंत होणे हा एकमेव हेतू असेल तर अपयशी होणे कधीच टाळता येणार नाही. उद्योगात अति लोभी होणे हि सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. लोभ तुमचा उद्योग उभा करण्या ऐवजी तुम्हाला उध्वस्त करू शकतो. फक्त उद्योगातून कीती पैसे उभे करायचे याच्यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी ग्राहकाला सर्वोत्तम सेवा कशी देता येयील , सहकाऱ्यांना कसे प्रेरित करता येईल, चांगले सहकारी कसे जोडता येतील, चांगल्या गुंतवणुका कशा करता येतील यावर लक्ष केंद्रित केले तर अपेक्षित श्रीमंती अनुषंगाने तुमच्याकडे आकर्षित होईल.

५) स्वतःच्या चुका न स्वीकारणे –
चुका करणे एक बाब तर त्या स्वीकारणे आणि सुधारणे दुसरी. मी चुकलो हे मान्य केल्याशिवाय त्या सुधारणे कधीच शक्य नाही. बहुतेक उद्योजक स्वतःच्या चुका मान्य करणे टाळतात. त्यांचा हा ठाम विश्वास असतो की त्यांची मतप्रणाली, योजना आणि कार्यपद्धती सर्वोत्तम आहे आणि त्यावर कोणी बोट उचलता कामा नये. एखाद्या महत्वाच्या सल्ल्याकडे किंवा कल्पनेकडे या मुळे दुर्लक्ष केलं जातं आणि अपेक्षित सुधारणा आणि प्रगती होत नाही. अनेकदा स्वतःच्या चुकांचे खापर परिस्थितीवर अथवा इतर लोकांवर फोडले जाते.

६) उतावळेपणा –
आकडेवारी प्रमाणे दरवर्षी ६०% उद्योग उतावळ्या उद्योजाकांमुळे बंद पडतात. उद्योग सुरु झाल्या झाल्या मोठ्या परिणामाची अपेक्षा उद्योगापासून ठेवली जाते. उतावळेपणा हा अतिशय घातक आजार आहे, जो उद्योगाला बाळसं धरण्याआधी आक्रमण करून संपवून टाकतो. नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की उद्योग रातोरात उभा राहत नाही. उद्योगात काही तत्व लक्षात घेणं गरजेच आहे “measurable progress in Reasonable Time “. शेतकर्याप्रमाणे पेरल्यावर उगवण्याची वाट पहावी लागते.

७) ब्रांड न बनविणे –
अनेक नवोदित उद्योजक काम पूर्ण करण्यावर जास्त भर देतात आणि स्वतःच्या उद्योगाची एक स्पष्ट ओळख निर्माण करण्याचे विसरतात. तुम्ही उद्योग सुरु केल्या केल्या बरीच लोकं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे उद्योगाची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे परिणामी तुमचे संभावित ग्राहकांना स्पष्टपणे कळेल की तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. एक चांगला ब्रांड फक्त तुमची विश्वसनीयता वाढवत नाही तर तुमच्या उद्योगाची तत्वप्रणाली ग्राहकांपर्यंत पोहोचवतो ज्यामुळे तुम्ही ग्राहकाच्या लक्षात तर राहातच पण ग्राहक देखील तुमच्याशी व्यवहार करायला प्रेरित होतो.