मुंबई, १८ एप्रिल :- आज दक्षिण मुंबईतील प्रेस क्लब येथे दुपारी 3 वाजता द महाराष्ट्र उद्योग या वेब पोर्टलचा उद्धघाटन सोहळा पार पडला. हा सोहळा मुंबई व्यापारी संघटनाचे अध्यक्ष आणि द महाराष्ट्र उद्योगचे संस्थापक अनिल फोंडेकर यांनी आयोजित केला असून, ह्या सोहळ्याला झी २४ तासचे संपादक निलेश खरे आणि आर्थिक सल्लागार प्रकाश पागे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

आपल्यातील अनेकांना मराठी माणूस आणि व्यवसाय हे एक न जुळणारे समीकरण वाटते. व्यवसाय करणं हे काही मराठी माणसाचं काम नाही, असंही अनेकांचं मत आहे. पण, लोकांची हीच विचारसरणी खोटी ठरवत गेली अनेक वर्षे अनिल फोंडेकर हे द महाराष्ट्र रोजगार, अवनि लघुउद्योग व्हॅन आणि नोकरी व उद्योग मेळाव्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करत आहेत. सध्या महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या विविध जिल्ह्यामध्ये 107 अवनि लघुउद्योग व्हॅन जोमाने सुरू आहेत.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात खूप व्यवसाय बंद पडले. पण त्या काळातसुद्धा असे काही व्यवसायिक होते ज्यांनी आपले व्यवसाय जोमाने सुरू ठेवले तर, काहींनी याच काळात अगदी नव्याने आपले व्यवसाय सुरू केले आणि अशाच उद्योजकांना प्राधान्य देण्याकरिता व खासकरून महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी नवीन मराठी उद्योजक तयार करावेत. शिवाय याला स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा लोन, व्याज परतवा, बीज भांडवल वगैरे केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना आणि या व्यवसायांना नॅशनल बँक, सारस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसीबँक या विना तारण 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार असणाऱ्या विविध राष्ट्रीयकृत, सहकारी आणि कॉर्पोरेट बँकांची साथ मिळवून देण्यासाठी http://www.themaharashtraudyog.com या मराठी उद्योजकांच्या हक्काच्या व्यवसायिक व्यासपिठाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मराठी उद्योजकांनी पुढे यावे म्हणून, त्यांची मानसिकता बदलावी, हिंमत वाढवी म्हणून गेले कित्येक वर्ष अनिल फोंडेकर रोजगार स्वयंरोजगार चे काम करत आहेत. त्याचाच धागा पकडून अनिल फोंडेकर आणि त्यांची टीम तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी मराठी व्यावसायिकांसाठी असलेले महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता www.themaharashtraudyog.com या वेबसाईट द्वारे आवाहन करत आहेत की, ज्यांचे स्वतःच्या मेहेनतीचे, कल्पकतेचे विविध क्षेत्रातील प्रोडक्ट्स असतील त्यांनी या वेबसाईट वर स्वतःचे प्रॉडक्ट्स नोंदविण्यातकरिता आवाहन करत आहेत.